UPI चा फुल फॉर्म हा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस.
यूपीआयच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही पेमेंट अॅपच्या मदतीनं भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करु शकतात.
पण आता त्याच्या मदतीनं भारतीयांसाठी परदेशात पैशांची देवाण-घेवाण करणं हे सोपं झालं आहे.
भारताशिवाय कोणत्या कोणत्या देशांमध्ये यूपीआय वापरतात हे जाणून घेऊया.
भारताशिवाय भूतान, मॉरिशियस, नेपाळ, सिंगापुर, श्रीलंका, फ्रान्स आणि यूएईमध्ये वापरता येतात.
याशिवाय मलेशिया, थायलॅन्ड, फिलीपीन्स, वियेतनाम, कंबोडिया, दक्षिण कोरिया, जपान, तायवान आणि हॉंगकॉंगमध्ये देखील वापरतात.
काही काळात ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि इतर युरोपीय देशांसोबत अमेरिकेत देखील वापरण्यात येण्याची शक्यता आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)