नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नवीन विक्रमाला गवसणी घातली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितने दुसरं स्थान मिळवलं आहे.
रोहितने मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये सात षटकार लगावले.
अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये रोहितच्या नावावर आता एकूण 338 षटकार आहेत.
रोहितने दुसऱ्या सामन्यामध्ये सात षटकार लगावत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकलं.
गेलच्या नावर अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 331 षटकार आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे या यादीमध्ये पहिल्या स्थानी म्हणजेच रोहितच्या पुढे एक पाकिस्तानी खेळाडू आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू आहे पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी!
शाहीद आफ्रिदीच्या नावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 351 षटकार आहेत. रोहित आता त्याच्यापासून अवघे 13 षटकार दूर आहे.