काँग्रेस खासदार राहुल गांधी दोन दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत.
यादरम्यान ते बाईकने पॅंगॉन्ग लेकच्या वाटेवर निघाले आहेत. या सरोवराच्या काठावर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती.
"माझ्या वाटेवर पॅंगॉन्ग सरोवर. हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे," असे राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी 20 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा वाढदिवस पॅंगॉन्ग तलावावर साजरा करणार आहेत.
लडाखला पोहोचल्यानंतर राहुल गांघी पॅंगोंग सरोवरावर जाण्यासाठी राहुल गांधींनी बाईकचा वापर केला
लडाखमधील मुक्कामादरम्यान राहुल गांधींनी कारगिल स्मारकालाही भेट दिली आहे. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी 30 सदस्यांच्या लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सभेलाही उपस्थित राहणार आहेत.
राहुलला बाइक चालवण्याची आवड आहे. त्याच्यासोबत नेहमीच कडक सुरक्षा असते, त्यामुळे तो हे करू शकत नाही.
राहुल गांधी यांच्याकडे केटीएम बाईक आहे. पण ती घरीच उभी असते. राहुल गांधींच्या सुरक्षेत तैनात असलेले जवान त्यांना बाईक चालवू देत नाहीत.