RD अकाऊंट असणाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पैसे वाढणार की बुडणार?
सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर अल्प प्रमाणात बचत करणाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. आता तुम्ही म्हणाल या निर्णयानंतर पैसे वाढणार की बुडणार?
सणासुदीचे दिवस तोंडावर असतानाच आता केंद्रानं काही निर्णय घेत नागरिकांना खास गिफ्टच दिलं आहे.
5 वर्षांसाठी करण्यात येणाऱ्या RD वरील व्याजदर सरकारनं वाढवले आहेत.
5 वर्षांसाठी करण्यात येणाऱ्या रिकरिंग डिपॉझिट अकाऊंटवर ही व्याजदरवाढ मिळणार असून, इतर आरडीवरील व्याजदर जैसे थे आहेत.
5 वर्षांसाठीच्या आरडीवर पूर्वी 6.5 टक्क्यांनी व्याज मिळत होतं. आता मात्र हे प्रमाण वाढलं असून, 6.7 करण्यात आलं आहे.
1 ऑक्टोबरपासून ही व्याजदरवाढ लागू होत असून, हे प्रमाण 20 बेस पॉईंट्सनं वाढलं आहे.
1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंतच्या काळासाठी ही दरवाढ लागू असेल. थोडक्यात तुम्हीही दीर्घ काळासाठी आरडी अकाऊंट काढलं असेल तर, याचा तुम्हाला फायदा मिळणार आहे.