Republic Day 2024 : काय आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम?
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान दर वर्षी काही ठराविक विषय हाताळण्यात येतात.
हेच विषय प्रजासत्ताक दिनाची थीम असतात. देशाची प्रगती, लोकशाहीची तत्वं आणि सांस्कृतिक वारसा अशा गोष्टींवर ही प्रजासत्ताक दिनाची थीम आधारलेली असते.
यंदाच्या म्हणजेच 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानंही एक खास थीम निर्धारित करण्यात आली आहे.
26 जानेवारी 2024 रोजी भारतात प्रजासत्ताक दिन 'विकसित भारत' आणि 'भारत लोकतंत्र की मातृका' या दोन थीमनं साजरा केला जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथावर सादर केल्या जाणाऱ्या संचलनांमध्येही याच थीमला अनुसरून चित्ररथ साकारण्यात येणार आहेत.
यंदाच्या वर्षाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे राजपथावरील संचलनामध्ये महिला शक्तीचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे.