Reserve Bank Of India Jobs 2025: सरकारी नोकरी, चांगला पगार आणि तितक्याच चांगल्या सुविधांच्या शोधात असाल तर आरबीआयनं तुमच्यासाठी नवी कवाडं खुली केली आहेत.
RBI मध्ये मेडिकल कंसल्टंट (MC) पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध असून, अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. 14 फेब्रुवारी 2025 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल.
वरील पदासाठी अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी असावी. जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारेही या नोकरीस पात्र आहेत. अर्जदारांना किमान दोन वर्षे कामाचा अनुभव असावा.
प्रकट मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. तीन वर्षांच्या करारान्वये उमेदवार निवड होणार असून, त्यांना ताशी 1000 रुपये रिंबर्समेंट मिळेल.
अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी Application Address: Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve Bank of India, Kolkata Regional Office, 15, Netaji Subhas Road, Kolkata - 700001 या पत्त्यावर फॉर्म पाठवावा.
वरील नोकरीच्या पदाविषयीच्या सविस्तर तपशीलासाठी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.