छत्री विकत घेताना तिचा वापर आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्रीची निवड करावी.
बाजारात असलेल्या स्वस्तातल्या छत्र्या, प्लास्टिकच्या तारा असलेल्या छत्र्या विकत घेणं टाळा.
पावसात छत्री वापरल्यानंतर ऑफिस किंवा घरी आल्यानंतर ओली छत्री लगेच बंद करू नका. छत्री पूर्णपणे सुकल्यानंतरच बंद करा.
छत्री ओली असतानाच बंद केल्यास तिच्या काड्या गंजतात.
तसेच छत्री ओली असताना बंद केल्याने तिचं कापडही खराब होतं. अशी छत्री फार काळ टीकत नाही.
त्यामुळे छत्री बंद करुन बँगेत ठेवण्यापूर्वी ती पूर्णपणे सुकवणे गरजेचे आहे.
जोरदार वारा वाहत असेल तर अशा पावसात छत्री शक्यतो वाऱ्याच्या दिशेलाच ठेवणं फायद्याचं ठरतं.
वाऱ्यात विरुद्ध दिशेला छत्री धरल्यास ती उलटण्याची आणि तिच्या काड्या तुटण्याची शक्यता अधिक असते.
काही वेळेस वाऱ्याचा इतका फटका छत्रीला बसतो की तिचं कापडही मूळ साच्यापासून म्हणजेच तारांपासून वेगळे होते.
नेहमी छत्री हळूच उघडावी. झटकन छत्री उघडताना तिची तार तुटण्याची शक्यता असते.