खासगी कोचिंग क्लासेस बंद, 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या सरकारच्या नव्या गाईडलाइन्स

Jan 19,2024


देशभरात खासगी कोचिंग क्लासेसकडून सुरु असलेल्या मनमानीला चाप लावत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

10 मुद्द्यांमध्ये या गाईडलाइन्स समूजन घ्या

1) कोचिंगसाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती केली जाईल ते किमान पदवीधर असावेत.

2) अॅडमिशन देताना विद्यार्थ्यांच्या पालकांना चांगले मार्क, रँक अशी खोटी आश्वासनं दिली जाणार नाहीत.

3) कोचिंग सेंटर्स 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही.

4) जर विद्यार्थ्याचं वय 16 पेक्षा कमी असेल तर माध्यमिक शाळेतील परीक्षेतनंतरच त्याला प्रवेस दिला जाऊ शकतो.

5) कोचिंग सेंटरमधील सुविधा, दर्जा याच्या आधारे विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील अशा जाहिराती करु नये.

6) कोचिंग सेंटरमध्ये प्रति विद्यार्थी किमान जागेपेक्षा कमी असल्यास नोंदणी करणे आवश्यक आहे.

7) एखाद्या नैतिक गुन्ह्यात दोषी आढळलेल्या शिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकत नाही.


8) कोचिंग सेंटरची एक वेबसाईट हवी ज्यात शिक्षकाची योग्यता, अभ्यासक्रम, कोर्स पूर्ण होण्याचा काळ, राहण्याची सुविधा (असल्यास), फी, सोपी एक्झिट पॉलिसी, फी परतावा प्रक्रिया, विद्यार्थी संख्या याची माहिती हवी.

9) वेबसाईटवर त्या विद्यार्थ्यांची माहिती असावी ज्यांना कोचिंगमध्ये शिकल्यानंतर उच्च शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला आहे.

10) विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा कॉलेजच्या वेळेत कोचिंग क्लालेस नसावेत.

VIEW ALL

Read Next Story