भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फुल कमळ, राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रभाषा हिंदी ही अशी माहिती शालेय जीवनापासूनच देण्यात येते.
राष्ट्रीय भाजीविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? Google ची मदत न घेता या प्रश्नाचं उत्तर द्यायला अनेकांनाच जमत नाही. तुम्हाला हे शक्य आहे का?
भारत हा एक असा देश आहे, जिथं दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे या भाज्या. फळभाज्यांपासून अगदी पालेभाज्यांपर्यंत या भाज्यांचेही बहुविध प्रकार पाहायला आणि जेवणाच्या माध्यमातून खायलाही मिळतात.
रोजच्याच आहारत येणारी एक भाजी, चक्क राष्ट्रीय भाजी आहे. अनेकांचाच यावर विश्वास बसणार नाही. पण, हे खरंय.
जवळपास 99 टक्के नागरिकांना या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्यामुळं अनेकजण सरसकट या प्रश्नाचं उत्तर देताना 'कोबी'चा उल्लेख करतात.
प्रत्यक्षात मात्र लाल भोपळा ही भारताची राष्ट्रीय भाजी असून, फक्त भारतच नव्हे, तर परदेशातही भोपळा आवडीनं खाल्ला जातो. अर्थात तेथील भोपळ्याची चव वेगळी असते.