आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल आहेत. त्यात लॉकडाऊनपासून लहान मुलांसाठी देखील वेगळे मोबाईल फोन घेण्यात आले आहेत.
जे लोक एका हातानं मोबाईल वापरतात ते आनंदी आणि मनमिळाऊ असतात असं माईंड जर्नलमधील एका आर्टिकलमध्ये म्हटलं आहे.
फोन एका हातात पकडतात आणि दुसऱ्या हाताच्या पहिल्या बोटानं तो वापरतात ते लोक कल्पक आणि कलाप्रेमी असतात. त्यांनी साचेबद्ध आयुष्य जगायला आवडत नाही आणि ते करिअरमध्ये यशस्वी होतात.
दोन्ही हातांनी मोबाईल पकडून टाईप करणारे लोकं सगळ्यांच्या मनात एक छाप सोडून जातात.
जे लोक दोन्ही हातात फोन पकडूनही एका अंगठ्यानं स्क्रोल करतात ते कामाला घेऊन सतर्क असल्याचं म्हटलं जातं.
जे लोकं असं करतात ते करिअरमध्ये सगळ्या गोष्टींचे निर्णय हे प्लॅनिंग करुन घेतात. तर इतरांची काळजी घेतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)