नोटांसंदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांबरोबर नक्कीच शेअर करा.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही 2 हजारांची नोट वेगळ्या रुपाने तुमच्याच खिशात येणार आहे.
म्हणजेच सध्या गोळा केल्या जाणाऱ्या 2 हजारांच्या नोटांचा कागद पुन्हा नव्या नोटा बनवण्यासाठी वापरला जाईल.
चांगल्या प्रतीचा कागद असलेल्या नोटा रिसायलक करण्यासाठी म्हणजेच त्यांचा लगदा करुन तो पुन्हा नव्या नोटा बनवण्यासाठी वापरला जातो.
आरबीआय या कोळश्याच्या वीटा इंडस्ट्रीयल वापरसाठी विक्रीस देण्याच्या उद्देशाने टेंडर काढते. या टेंडरच्या माध्यमातून या इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या विटांची विक्री केली जाते.
ज्या नोटा या सिस्टीमकडून रिजेक्ट केल्या जातात म्हणजेच रिसायकल करण्याजोग्याही नसतात त्या नष्ट केल्या जातात. या नोटा जाळून त्याच्या राखेपासून इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या छोट्या आकाराच्या विटा तयार केल्या जातात.
प्रत्येक CVPS सिस्टीम एका तासामध्ये 60 हजार नोटा तपासू शकतो. नोटा मोजण्याबरोबरच त्या ठराविक नियमांनुसार चलनी नोटा म्हणून वापरता येऊ शकतात की नाही यानुसार या सिस्टीममधून वर्गिकरण केलं जातं.
यानंतर CVPS सिस्टीममधून सर्व नोटा तपासून पाहिल्या जातात आणि त्या वापरण्यास योग्य आहे की नाही हे निश्चित केलं जातं.
सर्व बँकांमधून गोळा केलेल्या चलनातून बाहेर काढल्या जाणाऱ्या नोटा (सध्याच्या स्थितीत 2 हजाराच्या नोटा) रिझर्व्ह बँकेत एकत्र केल्या जातात.
ज्या नोटांचं आयुष्य संपलं आहे, त्या चलन म्हणून वापरता येणार नाहीत त्यांची रितसरपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आरबीआयचे काही नियम आहेत.
सामान्यपणे ज्या नोटांचं आयुष्य संपलं आहे त्या नोटांचं काय करायचं यासंदर्भातील वर्गीकरण करणारी ही CVPS सिस्टीम आहे. याच सिस्टीमचा वापर 2 हजारांच्या नोटांसाठीही होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करन्सी व्हेरिफिकेश अॅण्ड प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजेच CVPS नुसार या नोटांची विल्हेवाट लावणार आहे.
मात्र आता बँकांनी गोळा केलेल्या या 2 हजारांच्या नोटांचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात...
नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ची डेडलाइन आरबीआयने दिली आहे. त्यामुळेच अनेकजण बँकेत जाऊन 2 हजारांच्या नोटांच्या मोबदल्यात 500 किंवा 100 च्या नोटा घेत आहेत.
19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजारांच्या नोटा चलनामधून बाहेर काढण्यासंदर्भातील पत्रक जारी केल्यानंतर 23 मेपासून नोटा बदलून देण्यास सुरुवात झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गोळा केल्या जाणाऱ्या 2 हजारांच्या नोटात पुन्हा तुमच्याच खिशात येणार असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना?