गावाकडे आपण गोलाकार आकाराच्या दगडाने वेढलेल्या विहिरी पाहिल्या असतील.
पण या विहिरी त्रिकोणी, षटकोनी, चौकोनी अशा आकारात का नसतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
विहिरी गोलाकार असण्यामागे शास्त्रीय कारण दडलंय, ते आपण जाणून घेऊया.
विहिरीचा एक भाग हा खाली खोल असतो तर दुसरा भाग हा वर दिसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विहीर ही गोलाकार असते.
गोलकार असल्याने विहिरीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. विहीरी जास्त काळा टिकाव्या म्हणूनच विहीर गोलाकार स्वरूपात असतात.
विहीर ही चौकोनी किंवा षटकोनी आकाराची असती तर त्याच्या टोकांना पाण्याचा दबाव जास्त राहिला असता आणि विहीरी टिकल्या नसत्या.
गोलाकार आकारात टोकं नसतातच त्यामुळे येथे पाण्याच दबाव पडतं नाही. तेव्हा विहीरी शतकानूशतके टिकून राहतात.