सर्वसाधारणपणे प्रत्येक रेल्वेच्या मागे X चिन्ह पहायला मिळतं. प्रत्येक रेल्वेच्या मागे X चिन्ह असणं गरजेचं आहे.
रेल्वेच्या मागे असणाऱ्या या चिन्हामुळे स्टेशन मास्तरला एक विशेष सुचना मिळते.
शेवटच्या डब्यावर असणाऱ्या या चिन्हामुळे रेल्वेचे डबे संपल्याची माहिती मिळते.
जर रेल्वेच्या मागे हे चिन्ह नसेल तर रेल्वेचे डब्बे सुटले असा इशारा मिळतो.
मात्र, तुम्हाला माहितीये का? वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X चिन्ह नसतं.
त्याचं कारण म्हणजे या रेल्वेला विभक्त केलं जाऊ शकत नाही. त्याचबरोबर याला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन असते.