मुंबईला विजय मिळवून देताना आकाशाने केलेल्या कामगिरीमुळे त्याला नवी ओळख मिळालीये.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वातील एलिमिनेटर सामना गाजवला.
चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये आकाश मधवालने ऐतिहासिक कामगिरी केली.
3.3 ओव्हरमध्ये आकाशने 5 रन देत लखनऊ सुपर जायण्ट्सच्या 5 खेळाडूंना बाद केलं.
आकाशने या कामगिरीमुळे अनिल कुंबळे, जसप्रित बुमराह यासारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
आकाश सर्वात कमी धावा देऊन जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. या यादीत कोणते खेळाडू आहेत पाहूयात...
सहाव्या स्थानी आहे मुंबईचाच जसप्रीत बुमराह. बुमराहने 2022 मध्ये कोलकात्याविरुद्ध 10 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या.
यादीत पाचव्या स्थानी म्हणजेच बुमराहपेक्षा सरस कामगिरी करत आकाश मधवाल आहे. त्याने 5 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या.
या यादीमध्ये अनिल कुंबळे चौथ्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळताना 2009 साली 3.1 ओव्हरमध्ये 5 धावांच्या मोबदल्यात 5 गड्यांना बाद केलं होतं. हा सामना राजस्थानविरुद्ध झाला होता.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झॅम्पा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. 2016 मध्ये पुण्याच्या संघाकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हमध्ये 19 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद केले होते.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 2008 च्या म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या पर्वात 14 धावांच्या मोबदल्यात 6 गड्यांना बाद केलेलं. राजस्थानकडून खेळताना त्याने चेन्नईविरुद्ध हा पराक्रम केलेला.
अल्जारी जोसेफ हा वेस्ट इंडिजचा खेळाडू या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने 2019 मध्ये मुंबईकडून खेळताना हैदराबादचे 6 गडी अवघ्या 12 धावांमध्ये तंबूत धाडलेले. हा पराक्रम त्याने केवळ 3.4 ओव्हरमध्ये केलेला.
आकाशची कामगिरी आणि ही यादी पाहता तो बराच वेळ या रेकॉर्ड लिस्टमध्ये राहील असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.