सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या अव्वल 10 फलंदाजांच्या यादीमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
16 सामन्यांमध्ये 454 धावा मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तो या यादीत 10 व्या स्थानी आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा यंदाच्या सिझनचा मॅच विनर ठरलेल्या आणि या यादीत 9 व्या स्थानी असलेल्या रिंकूने 14 सामन्यांमध्ये 474 धावा केल्या असून यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार या यादीत आठव्या स्थानी आहे. त्याने 516 धावा केल्या असून यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोच्च स्कोअर 69 इतका आहे.
विजेत्या ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या आहेत. तो या यादीत सातव्या स्थानी आहे. त्याने या पर्वामध्ये 4 अर्धशतकं लगावली असून त्याचा सर्वोच्च स्कोअर 92 आहे.
सिझनची अडखळती सुरुवात झाल्यानंतर सुर्यकुमारने नंतर चांगलीच मुसंडी मारत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 6 व्या स्थानी झेप घेतली. 16 सामन्यांमध्ये त्याने 605 धावा केल्या. यात 5 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.
राजस्थानचा हा सलामीवर 625 धावांसहीत या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकं आणि एक शकत झळकावलं आहे.
विराट कोहलीने 14 सामन्यांमध्ये 639 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांबरोबरच 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
चेन्नईचा हा सलामीवर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 16 सामन्यांमध्ये 672 धावा केल्या असून त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत.
आरसीबीचा कर्णधार या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावावर 730 धावा आहेत. त्याने या स्पर्धेत 14 डावांमध्ये फलंदाजी करताना 8 अर्धशतकं झळकावली आहेत. काही काळ ऑरेंज कॅप त्याच्याकडे होती.
ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या शुभमन गिलने 17 सामन्यांमध्ये 890 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकं आणि 3 शतकांचा समावेश आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना ऑरेंज कॅप दिली जाते. यंदा हा मान शुभमने मिळवला असला तरी टॉप 10 मध्ये कोण कोण आहे तुम्हाला माहितीये का? चला पाहूयात...