उल्हास नदीकाठी वसलेले, कॅनियन व्हॅली हे लोणावळ्याच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असे हे ठिकाण मुंबई आणि पुण्यातील त्या ट्रेकर्सनी पसंत केले आहे जे नेहमी एक दिवसात होणारी एखादी जवळची जागा शोधत असतात.
इमॅजिका अॅडलॅब्स हे लोणावळ्याजवळ खोपोली-पाली रोडवरील एक विस्तृत थीम पार्क आहे. थीम असलेली रेस्टॉरंट्स, लाउंज एरिया, बार आणि निवास उपलब्ध आहेत.
तुंगार्ली तलाव हे पर्यटकांनी आराम करण्याचे आणि निसर्गाचा आनंद घेण्याचे ठिकाण आहे. या तलावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे १९३० साली बांधण्यात आलेले तुंगार्ली धरण आहे.
कुणे धबधबा म्हणजे लोणावळ्यात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या सौंदर्याचे सर्वात भव्य रूप. हा धबधबा सह्याद्री पर्वतांच्या कुशीत 622 मीटर उंचीवर वसलेला आहे. त्रिस्तरीय धबधबा प्रकारात मोडणाऱ्या या धबधब्याची उंची 200 मीटर आहे.
राजमाजी किल्ला हा लोणावळ्यात पर्यटकांचे सर्वोच्च पसंतीचे ठिकाण मानले जाते. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2,710 फूट उंचीवर असून इथून सह्याद्री पर्वत तसेच शिरोटा धरण खाडीचा नयनरम्य नजारा दिसतो. राजमाची किल्ला हा शिवाजी महाराज, सम्राट औरंगजेब, शाहू महाराज आणि ब्रिटीश राजवटीचा साक्षीदार आहे.
पवना सरोवर हा कृत्रिम जलाशय असून लोणावळ्यात कॅम्पिंगकरिता पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे पर्यटक निसर्ग आणि आल्हाददायक हवामान इत्यादीची मजा लुटू शकतात.
लोणावळ्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे ड्यूक्स नोज. ड्यूक्स नोज पॉइंटवरून खंडाळा घाटाचा काळजाचा ठेका चुकवणारा नजारा पाहायला मिळतो. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावावरून या जागेचे नाव पडले आहे.
भुशी डॅमचे पाणी पायऱ्यांवरून वाहत खडकाळ परदेशातून मार्गक्रमण करत पाहणाऱ्याचे मन वेधून घेते. किलबिलाट करणारे पक्षी, हिरवाकंच निसर्ग आणि आल्हाददायी जलप्रपाताची भुरळ पर्यटकांना पडते.
कार्ला लेणी हे भारतामधील सर्वात मोठे हिनायन बौद्ध चैत्य (मंदिर) आहे, ज्याची उभारणी सातवाहनाच्या राजवटीत करण्यात आली. या वास्तूचे 2000 वर्षे जुन्या लाकडी तुळया अजूनही शाबूत आहेत.
लोणावळ्यातील टायगर पॉइंट किंवा टायगर लीप हे 650 मीटर डोंगर शिखरावर वसलेले, हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण. टायगर पॉइंट हे पर्यटकांनी नक्की भेट द्यावे असे लोणावळ्यातील ठिकाण!