या दिवशी एकादशी व्रत केल्याने २४ एकादशीचे पुण्य प्राप्त होते असा म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी काही खास गोष्टी घरी आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. व्यापारात भरभराटीला येते आणि पैसे टिकतो.
निर्जला एकादशीचे व्रत सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढविणारे मानले जाते. निर्जला एकादशीला कामधेनू गाईची मूर्ती घरी आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
असे म्हणतात मोरपंख घरात वाईट शक्तींना फिरकू देत नाही. निर्जला एकादशीला मोराची पिसे घरी आणून देवघरात ठेवा. यामुळे कालसर्प दोषही कमी होतो असे मानले जाते. (Photo Credit: Pinterest)
निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोपटे घरी आणल्याने माता लक्ष्मीची कृपा होते. पण एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये.(Photo Credit: Pinterest)
निर्जला एकादशीला पिवळ्या रंगाच्या कवड्या आणणे चांगले मानले जाते. ह्या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)