चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सीएसकेच्या विजयात एक मोठी भूमिका बजावली.
चेपॉकवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी अवघ्या 137 धावांवर रोखले, यामध्ये जडेजाने चार षटकांत 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
जडेजाला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार तर मिळाला पण सोबतच सीएसकेने त्याला एक स्पेशल नवं नावही दिलं आहे.
जसे की एमएस धोनीला ‘थाला’ आणि सुरेश रैनाला ‘चिन्ना थाला’ म्हणतात. यावर जडेजाने सांगितले की, माझी बिरुदावली अजून पक्की झालेली नाही, पण मला आशा आहे की एखादं स्पेशल नाव मलाही मिळेल.
चेन्नईने जडेजाला क्रिकेट थालापती असे नाव दिले आहे. थालापती या शब्दाचा अर्थ कमांडर किंवा नेता असा आहे.
जडेजाने कायमच सीएसकेसाठी शानदार कामगिरी केली आहे. जडेजा 2012 मध्ये चेन्नई संघाशी जोडला गेला आणि तेव्हापासून आतापर्यंत जडेजा सीएसकेचा एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.