ग्रीन टीमध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणास येण्यास मदत होते.
दालचिनी रक्तातील इन्सुलिन कमी करण्यास फायदे कारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो.
एक चमचा अॅपल सायडर विनेगर एक ग्लास पाण्यात घेतल्यानं मधुमेह नियंत्रणात राहतो
कोणत्याही प्रकारच्या हर्बल टी रक्तातील साखरेच प्रमाण नियंत्रणास मदत करते.
साखर न घातलेलं लिंबाचं पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
कोरपडच्या ज्युस पिणाऱ्यांच्या रक्तातील साखर ही नियंत्रणात राहते असं म्हटलं जातं.
हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे यामुळे जळजळ होणं थांबत आणि दुसरं रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
कारल्याचा ज्युस हा शुगरची समस्या असणाऱ्यांसाठी लाभदायक आहे. त्यामुळे रोज त्याचे सेवन करा.
रात्री एक ग्लास पाण्यात मेथी भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
भेंडी चिरून घ्यायची आणि एक ग्लास पाण्यात ती रात्री ठेवायची सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं. यात असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखर ही नियंत्रणात राहते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)