सारखी लघवीला होणे ही समस्या आरोग्याच्या विविध कारणांमुळे होऊ शकते. डायबेटिज, युरीन इंफेक्शन, प्रोस्टेट वाढणं इत्यादी यामागील कारण असू शकतात.
आवळा हा एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय असून जो वारंवार लघवीला होणे या समस्येवर गुणकारी ठरू शकतो. आवळा पावडरचे सेवन करू शकता यामुळे पचनक्रिया ठीक होते.
मेथीच्या दाण्यांमध्ये असे गुणधर्म असतात, ज्यामुळे सारखी लघवीला होण्याची समस्या दूर होऊ शकते. काही दिवस दररोज याचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.
आल्याचा रस देखील वारंवार लघवीला होण्याच्या समस्येवर गुणकारी ठरू शकतो. आल्याच्या रसाचे सेवन केल्याने लघवी करताना होणारी जळजळ दूर होते.
आल्याचे सेवन सकाळी आणि संध्याकाळी केले जाऊ शकते मात्र ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा रुग्णांनी सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुळशीच्या पानांमध्ये मूत्राशयाचा संसर्ग रोखण्याचे गुणधर्म असतात. तुळशीच्या पानाचे मधासोबत सेवन केल्याने अनेक फायदे मिळू शकतात.
रिठा रात्रभर पाण्यात भिजवून त्या पाण्याचे सेवन केल्याने सारखी लघवीला होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)