लसणाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. मात्र, त्याचबरोबर लसणाच्या सालींचाही वापर केला जातो
लसणाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन, पॉटेशियम, अँटी ऑक्सिडेंट्स आणि फ्लेवेनॉइड्ससारखे गुणधर्म असतात. या सालींचा वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग केला जातो
लसणाच्या साली पाण्यात 10 ते 20 मिनिटे उकळवून हर्बल टी बनवू शकता. हा चहा मसल्समध्ये होणाऱ्या वेदना कमी करतो तसंच, सूजही कमी करतो
स्कीनची जळजळ कमी करण्यासाठी लसणाची सालं खूप फायदेशीर आहे. ही साली पाण्यात भिजून ठेवून मग चेहऱ्यावर लावा
झाडांना खत म्हणूनही तुम्ही लसणाच्या सालींचा वापर करु शकता. लसणाच्या सालींचे खत टाकल्यास झाडांची वाढ चांगली होते.
लसणाच्या सालींमध्ये एक चांगला सुंगध व फ्लेवर असतो. त्यामुळं तुम्ही त्याचा वापर सूप किंवा ब्रोथमध्ये करु शकता.
घरात किटक किंवा चिलटे येत असतील तर लसणाच्या साली पाण्यात मिसळून ते पाणी घरात झिडका. किटक दूर पळतील
फोडणीचा भात बनवताना लसणाच्या सालींचा वापर केला जाऊ शकतो. मात्र या साली स्वच्छ करुनच वापरा