करपलेल्या दुधाचं भांड स्वच्छ करणे म्हणजे खूप मेहनतीचे काम असते. अशावेळी हे करपलेल्या भांड्यांचे हे डाग कसे काढावेत याच्या ट्रिक्स जाणून घेऊया.
लिंबू आणि बेकिंग सोडा करपलेल्या भांड्याचे डाग काढण्यास खूप फायदेशीर आहे.
सगळ्यात आधी भांड्यात पाणी टाकून त्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून उकळून घ्या. आता त्या पाण्यात लिंबाचा रस टाका. पाण चांगले उकळल्यानंतर भांड घासून घ्या.
व्हिनेगरदेखील करपलेल्या भांड्यावरील डाग स्वच्छ करण्यास मदत करतो. व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि ते मिश्रण भांड्यात टाकून उकळवून घ्या.
त्यानंतर हे पाणी भांड्यात टाकून चांगले साफ करुन घ्या.
भांड्यात थोडे पाणी घ्या आणि मीठ टाकून ते चांगले उकळवून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर भांडं चांगलं घासून घ्या.