डायबेटिज हा जगातील वाढत्या आजारांपैकी एक असून याने केवळ वृद्धच नाहीत तर तरुणही त्रस्त आहेत.
डायबेटिजवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर यामुळे इतर अनेक आजारांचा धोका सुद्धा वाढतो.
डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी औषधांसोबतच योग्य आहार घेणं सुद्धा गरजेचं आहे.
ड्रायफ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.
परंतु डायबेटिजच्या रुग्णांनी हा ड्रायफ्रूट्सचे सेवन करणे टाळायला हवे.
डायबेटिज रुग्णांनी खजुराचे सेवन करू नये. खजुरचे सेवन केल्याने ब्लड शुगर अचानक वाढते.
डायबेटिजच्या रुग्णांना मनुक्याचे सेवन करणे टाळायला हवे. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. मनुके चवीला खूप गोड असतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)