देशांतर्गत किंवा परदेशी विमानप्रवास असो, प्रत्येक वेळी प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते. निर्धारित नियमावलीनुसार ही तपासणी होते.
विमान, विमानातील प्रवासी आणि सुरक्षिततेच्या काही कारणास्तव ठराविक गोष्टी प्रवासात सोबत नेता येत नाहीत.
विमानात परवानगी नसणारी एक गोष्ट म्हणजे नारळ. मुख्यत्वे नारळ ज्वलनशील असल्यामुळं तो विमानप्रवासात सोबत नेता येत नाही.
बॅग चेक इन अर्थात सामानाची तपासणी होत असतानाच तो काढून घेण्यात येतो. नियमावलीनुसार विमानात कोणताही ज्वलनशील पदार्थ नेऊ दिला जात नाही. या पदार्थांच्या यादीत तूप आणि तेलाचाही समावेश असतो.
विमान प्रवासामध्ये काडेपेटी, लायडर, पेपर स्प्रे, हेरॉईन, मद्य, नेल कटर अशा गोष्टी केबिनमध्ये नेता येत नाहीत.
विविध विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनुसार हे नियम कमीजास्त फरकानं बदलत असतात. पण, बहुतांशी नियमांमध्ये मात्र एकसारखेपणा आढळतो. त्यामुळं काही नियम लक्षात ठेवलेले बरे.