जवळपास प्रत्येक घरात माचीस वापरली जाते. माचीसचे अनेक उपयोगही असतात.
पण तुम्हाला माहितीये का, माचीसच्या काड्या बनवताना कोणते लाकूड वापरले जाते?
माचीसच्या काड्या बनवण्यासाठी चिनार लाकूड किंवा अफ्रिकन काळे लाकूड वापरले जाते.
या झाडांबद्दल बोलायचे झाले तर, ही झाडं 5 अंश ते 45 अंश तापमानात खूप चांगले वाढतात.
याशिवाय माचीसच्या काड्या बनवण्यासाठी व्हाईट पाईन किंवा अस्पेन देखील वापरले जातात.
चिनार लाकूड हे एक अत्यंत टिकाऊ आणि मजबूत लाकूड आहे.
अफ्रिकन काळ्या लाकडामध्ये एक विशेष प्रकारचे तेल असते, जे लाकडाच्या काडीला जास्त कालावधीपर्यंत जळण्याची क्षमता देते.
माचीसच्या काड्यांचा उपयोग फक्त घरातच नाही तर इतर उद्योगांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
माचीसच्या काड्या बनवण्यासाठी निवडक लाकडाचीच निवड केली जाते, ज्यामुळे त्या अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि कार्यक्षम होतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)