तव्यावर काळा थर साचलाय? ही पद्धत वापरून स्वच्छ करा, नव्यासारखा चमकेल

Mansi kshirsagar
Feb 13,2025


चपाती किंवा भाजीसाठी वापरण्यात येणारा तवा काळाकुळकुळीत झालाय. तर ही पद्धत वापरुन साफ करा मिनिटांत चमकेल


तवा साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण वापरा. बेकिंग सोड्यात पाणी टाकून एक पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट वापरुन तवा घासा.


लिंबू कापून त्यात मीठ मिसळून आता तो लिंबू तव्यावर घासा. लिंबातील अॅसिड आणि मीठातील स्र्क्रबिंगचा वापर करुन तवा चांगला घासा. यामुळं काळपटपणा निघून जाईल.


तवा गरम करुन त्यात थोडे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाकून तवा स्वच्छ कपड्याने साफ करा. जेणेकरुन त्यावरील डाग आणि काळपटपणा दूर होईल.


तवा थोडासा गरम करुन त्यात थोडेसे तेल टाका आणि मीठ टाका. त्यानंतर तवा चांगला घासून घ्या. यामुळं तव्याचा काळपटपणा हटवण्यास मदत होईल


तवा साफ केल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतरच वापरा. तवा गंजला असला तर त्याला तेल लावून तुम्ही जंग काढू शकता आणि पुन्हा तवा वापरु शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story