jio ने त्यांच्या दोन प्लॅनची वैधता बदलली आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा कमी वैधता मिळणार आहे.
आम्ही जिओच्या 69 आणि 139 रुपयांच्या डेटा अॅड-ऑन्सबद्दल बोलत आहोत. याआधी हे प्लॅन बेस प्लॅनच्या वैधतेसह येत होते.
ज्यामध्ये या प्लॅनचा डेटा तुम्ही तुमच्या बेस प्लॅनच्या दिवसांसाठी टिकेल तितक्या दिवसांसाठी वापरू शकत होता.
मात्र, आता हे प्लॅन त्यांच्या स्वतंत्र वैधतेसह येत आहेत. ज्याची वैधता फक्त 7 दिवसांसाठी असणार आहे. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला सर्व डेटा वापरावा लागेल. यापूर्वी या प्लॅनची वैधता 35 दिवसांची होती.
लक्षात ठेवा, हे दोन्ही डेटा अॅड-ऑन प्लॅन जर तुमच्याकडे बेस प्लॅन असेल तरच वापरू शकता. याशिवाय या डेटा बेनिफिट्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.
यामध्ये 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा आणि 139 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना 64Kbps स्पीडने डेटा मिळेल.