फळं की फळांचा ज्यूस... Weight Loss साठी काय फायदेशीर?

Pooja Pawar
Nov 02,2024


दररोजच्या आहारात फळांचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.


काहीजण फळांपासून तयार झालेले ज्यूस पितात तर काहीजण फळ कापून खाण पसंत करतात.


पण आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फळं की फळांचा ज्यूस या दोघांपैकी काय जास्त महत्वाचं आहे याविषयी जाणून घेऊयात.


फळांमध्ये जास्त फायबर असते मात्र त्याचा शरीराला जास्त फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ज्यूस नाही तर फळांचे सेवन करता.


फळांमध्ये असलेले फायबर हे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे असते. तसेच फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स असतात.


फळांचा ज्यूस पिण्याच्या तुलनेत फळं शरीरातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासोबतच हे वजन कमी करण्यासही मदत करते.


फळांचा ज्यूस बनवून प्यायल्याने फळांमध्ये असलेले फायबर नष्ट होते.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संपूर्ण फळांचे सेवन करावे.


जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशा लोकांनी ज्यूस ऐवजी फळांचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story