आजकाल PCOD आणि PCOS ची समस्या सामान्य होत चाचली आहे. कमी वयातच अनेक मुलींना या समस्या जाणवतात.
PCOD किंवा PCOS असल्यास पाळी नियमित न येणे, त्वचा काळी होणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वजन वाढणे अशा समस्यांना यामुळे सामोरं जावं लागतं.
पण तुम्हाला माहित आहे का? असे काही पदार्थ आहेत ते खाणं टाळल्यास तुमचा हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.
फ्रेन्च फ्राइज, बटाट्याचे बेफर्स, तळलेले चिकन, मासे आणि कोणत्याही प्रकारचे तळलेले पदार्थ खाणं टाळावे.
सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ म्हणजे बटर किंवा मार्जरीन सारखे पदार्थ खाणं टाळा.
PCOD किंवा PCOS चा त्रास असल्यास कोणत्याही प्रकारचं लाल मांस आणि प्रक्रिया केलेलं मांस खाणं टाळावं.
मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खाणं टाळावं. जसं की सॉफ्टड्रिंग्स, पॅकेज फूड
व्हाईट ब्रेड, पास्ता, पिझ्झा या सारखे मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणं टाळावं.
ज्या कॅफिन आणि अल्कोहोल असणाऱ्या पेयांचे जास्त प्रमाणात सेवन करणं टाळावं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)