रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंग चावून खाल्ल्यास 'या' 9 समस्यांपासून मिळेल मुक्ती; ही यादी एकदा वाचाच

Swapnil Ghangale
Jan 28,2025

लवंग आरोग्यासाठी फायद्याचं

आयुर्वेदामध्येही लंवग हे आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

लवंगाचं रोज सेवन केलं तर...

मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक असलेल्या लवंगाचं रोज सेवन केलं तर अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहता येतं.

पोटासंदर्भातील समस्या

रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास पोटासंदर्भातील समस्या दूर होतात.

या समस्यांपासून मिळतो आराम

लवंगामुळे अतिसार, अॅसिटीडी आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

लवंग खाल्ल्यास या समस्या दूर होतात

दात किडले असतील किंवा तोंडाला दुर्गंधी येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास या समस्या दूर होतात.

दातांचं दुखणं

रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग चावून खाल्ल्यास दाढेसंदर्भातील समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि दातांचं दुखणंही कमी होईल.

डोकं दुखत असेल तर...

डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग खाव्यात. यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मोळतो.

सर्दी आणि खोकल्याची समस्या असल्यास

तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकला होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी 2 लवंग खाल्ल्यास या समस्येपासून सुटका होईल.

... तर रोज लवंगाचं सेवन करणं फायद्याचं

तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर रोज लवंगाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.

रोज रात्री झोपण्यापूर्वी...

रात्री झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुवून घ्यावं आणि दोन लवंग चावून खाव्यात. त्यानंतर कोमट पाणी प्यावं.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story