आपल्यापैकी अनेकांना जेवण बनवण्याचा फार कंटाळा असतो.
सकाळी बनवलेले पदार्थ कित्येक जण दिवसभर वारंवार गरम करतात आणि खातात.
तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थ असे आहेत ज्यांना पुन्हा गरम करून खाणे म्हणजे मोठमोठ्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
एकदा शिजवलेल्या भाताला वारंवार गरम केल्याने त्यामध्ये 'बॅसिलस सेरेस' नावाचे विषाणू तयार होतात. या बॅक्टेरियांमुळे पोटातील आतड्यांचे आजार उद्भवतात.
एकदा उकडलेले बटाटे पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये 'क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम' हे जीवाणू तयार होतात. असे जिवाणयुक्त अन्न खाल्याने 'बोटुलिझम' हा गंभीर आजार होऊ शकतो.
पालक ही एक आरोग्यवर्धक भाजी आहे. पण, पालक या पालेभाजीला वारंवार गरम करुन खाल्याने कॅन्सर सारखा महारोग होऊ शकतो
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. अंडी पुन्हा पुन्हा गरम करुन खाल्याने पोटासंबंधी आजारांची लागण होऊ शकते.
चिकन हा सर्वात जास्त प्रोटीन असलेला पदार्थ आहे. यामध्ये नायट्रोजनदेखील मोठ्या प्रमाणात असते. चिकन वारंवार गरम केल्याने यामधील नायट्रोजनचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक घातक आजार होण्याची दाट शक्यता असते.
तळलेले आणि तेलकट पदार्थ म्हणजेच समोसे, फ्रेंच फ्राइज असे खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये अनेक 'ट्रांस फॅट्स' तयार होतात. यामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता वाढते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)