भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते.
तुम्हाला माहित आहे का? चहा सोबत टोस्ट, भजी, पराठा असे खाद्यपदार्थ खातात हे खाल्ल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
हे पदार्थ चहासोबत खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
चहा सोबत कधीच तळलेले पदार्थ खाऊ नये. असे केल्याने पाचन क्रियेवर विपरीत परिणाम होतात.
चहासोबत पराठे किंवा कोणतेही मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवते.
मिर्चीची भजी ही चहासोबत खूप छान लागतात. पण, चहा सोबत असे तिखट गुणधर्माचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरते.
चहा आणि बिस्किट म्हाणजे जोडीदारच वाटतात. मात्र हा मेळ अगदी चुकीचा आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते.
चहा आणि टोस्ट हे सर्वांना खूप आवडणाऱ्या नाश्त्यांपैकी एक आहेत. टोस्टमध्ये रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन असते. हे चहा खाल्ल्याने लठ्ठपणाचा आजार होऊ शकतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)