कशी झाली 'व्हॅलेंटाइन डे'ची सुरूवात?

Feb 13,2025

खास दिवस

व्हॅलेंटाइन डे हा प्रियकर आणि प्रेयसीसाठी खास दिवस असून हा दिवस प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतिक असल्याचे मानले जाते.

संत व्हॅलेंटाइन

हा दिवस 'संत व्हॅलेंटाइन' यांच्या आठवणीत साजरा केला जातो. हे प्राचीन रोममधील एक ईसाई संत होते.

विवाहांवर प्रतिबंध

खरंतर, रोमन सम्राट क्लॉडियस यांनी त्या काळी विवाहांवर प्रतिबंध लावले होते. कारण त्यांच्या मते, विवाहित पुरुष हे चांगले सैनिक बनू शकत नाहीत.

आदेशाच्या विरोधात

संत व्हॅलेंटाइन यांनी क्लॉडियस यांच्या आदेशाच्या विरोधात जाऊन तरुण जोडप्यांचे लग्न लावून दिले होते.

14 फेब्रुवारी

संत व्हॅलेंटाइन यांच्या धाडसी वृत्ती आणि प्रेमाप्रती असलेल्या त्यांच्या भावनेच्या आठवणीत 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

भेट देतात

या दिवशी कपल्स एकमेकांना फुले, भेट देतात आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवतात.

प्रेम आणि स्नेहाची भावना

प्रेम आणि स्नेहाची भावना जपणे हा 'व्हॅलेंटाइन डे'चा उद्देश असून हा दिवस जगभरातील जोडप्यांमध्ये अगदी उत्साहात साजरा केला जातो.

VIEW ALL

Read Next Story