हिवाळ्यात तिळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तीळ हा गरम पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहतं.
तिळामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आढळते. शिवाय यात आयरन, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, सेलियम इत्यादी पोषक घटक असतात.
तिळाचे सेवन केल्याने शरीरातील ताकद वाढते आणि हाडं मजबूत होतात. तसेच त्वचा चमकदार बनते, केस मजबूत होतात आणि गुडघे दुखीपासून आराम मिळतो.
हिवाळ्यात लोक तीळ आणि गुळाचे सेवन जास्त प्रमाणात करतात. पण तिळाचे सेवन हे मर्यादित प्रमाणातच करायला हवे.
एका वयस्क व्यक्तीने दिवसाला 50 ते 70 ग्राम तीळ खाणं योग्य ठरतं. तर लहान मुलांनी यापेक्षा कमी तिळाचे सेवन करावेत.
ज्या लोकांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे अशा लोकांनी तीळ खाणं टाळावं. तीळ हा प्रोटीन रिच पदार्थ असल्याने याच्या सेवनाने युरिक ऍसिड वाढते.
तिळाचे अधिक सेवन केल्याने वजन वाढणे, पोटात ब्लॉटिंग होणे, बद्धकोष्ठता सारख्या समस्या निर्माण होतात. गरोदर महिलांनी तिळाचे सेवन करू नये.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)