घरबसल्या काही खायला मागवायचं असेल तर स्वीगी, झोमॅटो हे पर्याय तुमच्यासमोर येतात.
घरी जेवण बनवलं नसेल, अचानक भूक लागली तर लोक स्वीगी, झोमॅटोवरुन ऑर्डर करतात.
पण तुम्ही खायला मागवल्यावर स्वीगी आणि झोमॅटो तुमच्याकडून किती डिलीव्हरी चार्ज घेतात? माहिती आहे का?
स्वीगी किंवा झोमॅटोवरुन खायला मागवल्यावर प्लॅटफॉर्म फीस, जीएसटी, रेस्टॉरंट चार्ज, हॅण्डलिंग फी आणि डिलीव्हरी चार्ज पकडून बील तयार होतं.
प्लॅटफॉर्म फीस म्हणून तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतात.
डिलीव्हरी चार्ज संदर्भात कोणता अधिकृत डेटा उपलब्ध नाही. पण रिसिप्टनुसार लक्षात येते की, 10-15 रुपये प्रति किलोमीटर इतका चार्ज घेतात.
झोमॅटो आणि स्वीगीच्या प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 टक्के जीएसटी भरावा लागतो.
इतर फीस आणि शुल्क जोडून तुम्हाला 12 ते 22 टक्के इतका चार्ज झोमॅटो, स्वीगीवाले तुमच्याकडून घेतात.