शिक्षणासाठी भारताबाहेर म्हणजेच परदेशात जाण्याचे बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.
परंतु, फक्त भारतातून परदेशातच नव्हे तर इतर देशांमधून सुद्धा विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत असतात.
नेमक्या कोणत्या देशांमधून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतात? चला, जाणून घेऊया.
नुकतंच भारताने विद्यार्थ्यांसाठी दोन विशिष्ट श्रेणीतील वीजा देण्यास सुरुवात केली आहे.
गृहमंत्रालयाद्वारे E-Student Visa आणि E-Student -X Visa या दोन वीजा देण्यास सुरुवात केली आहे.
भारतात नेपाल, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि अमेरिकेसारख्या देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात.
2021-22 च्या रिपोर्टनुसार, परदेशातून भारतात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 47 हजाराच्या आसपास होती.
अशात, परदेशातून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्यांमध्ये नेपालच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.