तुम्ही कित्येकदा आकाशात गरुडाला घिरक्या घेताना पाहिलं असेल. गरुडाला शिकार करणारा पक्षी म्हणून ओळखलं जातं.
गरुडाची नजर तीक्ष्ण असते.
परंतु, तीक्ष्ण नजरेसोबत गरुडाचे अजून काही चकीत करणारे वैशिष्ट्ये आहेत. चला, पाहूया.
सामान्यत: मनुष्याची दृष्टी 20/20 असते. त्याचप्रकारे गरुडाची दृष्टी ही 20/5 असते. गरुड जवळपास तीन किमीपर्यंतची शिकार टीपू शकतो.
गरुड आकाशात 10 हजार फूट उंच उडू शकतात. गरुडाचे पंख आकाशात अत्यंत उंच भरारी मारण्यासाठी सक्षम असतात.
गरुडाची पकड ही मनुष्याच्या 10 पट अधिक मजबूत पकड असते. खासकरुन त्याच्या पंजाची पकड जास्त मजबूत असते.
गरुड नेहमी आपल्या साथीदारासोबतच राहतात.
इतर पक्षांच्या तुलनेत गरुड नेहमी मोठी घरटी बनवतात. त्यांची घरटीसुद्धा खूप उंचावर असतात.