जीन्स हा एक असा प्रकार आहे जो कित्येक दिवस न धुता घातली जाते.
एका डॉक्टरने आपण जीन्स, पजामा धुण्याआधी किती दिवस घालावं याबद्दल सांगितलं आहे.
वर्जिनियाचे डॉक्टर जेसन सिंह यांच्यानुसार, तुम्ही सतत अनेक दिवस पँट घालू नये.
डॉक्टर जेसनने सांगितलं की, एकच पँट, पजामा सतत घातल्यास मृत पेशी आणि इतर धोकादायक टॉक्सिन्स निर्माण होतात.
हे टॉक्सिन्स जमा झाल्याने बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. तसंच त्या घालून झोपल्याने धोका निर्माण होऊ शकतो.
जीन्स तुम्ही घालता त्यावेळी तुम्हाला किती घाम येतो यावरही हे अवलंबून असतं.
सलग तीन रात्रींनंतर तुम्ही पजामा बदलला पाहिजे असं डॉक्टर जेसन सांगतात.
अनेक लोक कित्येक आठवडे जीन्स, पजामाघालतात. पण हे फार धोकादायक असल्याचं डॉक्टर जेसन सांगतात.
लाँड्री एक्स्पर्ट आणि लिव्ह लाफ लॉनच्या लेखिका लौरा माउंटफोर्डचं म्हणणं आहे की, अनेक लोकांची कपडे सारखे धुण्याची इच्छा नसते. पण एक पँट दोन ते तीन वेळा घातल्यानंतर धुवायला हवी.
पँटवर डाग असतील, वास येत असेल तर घालण्याआधी ती धुवायलाच हवी.
हायजीन आणि स्वच्छता पाहता धुताना अँटी-व्हॅक्टेरिअल लिक्विडचा वापर करा.