फ्रिजच्या दारावरील रबर काळा पडलाय? फक्त दोन गोष्टी वापरून पटकन करा स्वच्छ
सहसा अनेक घरांमध्ये फ्रिजमध्ये भाज्या, कडध्यान्य, इतकंच काय तर किडामुंगी लागू नये म्हणून कडधान्यही ठेवलं जातं.
अन्नपदार्थांपासून लोणची, सॉस आणि तत्सम पदार्थांना फ्रिजमध्ये ठेवून दीर्घकाळासाठी टीकवता येतं.
असा हा फ्रिज वेळोवेळी स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं. अन्यथा त्यातही सूक्ष्म रोगजंतू वावर करण्याची भीती असते.
फ्रिजचा सर्वाधिक अस्वच्छ होणारा भाग म्हणजे दारावर असणारा रबर, किंवा गॅसकेट. हे गॅसकेट व्यवस्थित बसलं नाही, तर फ्रिज अपेक्षित Cooling करत नाही.
हे गॅसकेट कायम स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करु शकता. यासाठी एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून एक लिक्विड तयार करा. एका कापडाच्या मदतीनं हे मिश्रण रबरवर लावून तो स्वच्छ करून घ्या.
व्हिनेगर वापरूनही हा रबर स्वच्छ करता येतो. यासाठी व्हिनेगर पाण्यात मिसळून हे मिश्रण एका कापडाववर घेत किंवा एका ब्रशच्या सहाय्यानं गॅसकेट स्वच्छ करता येतं.