हिवाळ्यात सर्दी-खोकलासारखे आजार वाढतात. अशावेळी आलेपाक खाल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारीवर उपाय आहे.
आलेपाक ही पौष्टिक वडी असून त्यामुळं पचन सुधारण्यास मदत होते.
आलेपाक वडी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी
आलं- 2 कप, साखर 4 कप, तूप 2 ते 3 टेबलस्पून
सगळ्यात पहिले आल्याची सालं काढून घ्या. नंतर किसणीवर बारीक किसून घ्या
आलं किसून घेतल्यानंतर मोठ्या कढाईत टाका आणि त्यानंतर त्यात साखर घालावी
जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण ढवळत पाहा. पाक झाल्यानंतर गॅस बंद करा
आता एका ताटाला तूप लावून घ्या आणि मिश्रण व्यवस्थित त्यात पसरून ठेवा
पाक थोडा गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्या. आलेपाक खाण्यासाठी तयार