सकाळच्या वेळी चेहऱ्यावर येणारी सूज कशी दूर करावी?
सकाळच्या वेळी चेहऱ्यावर सूज येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मोबाईलचा अती वापर, सतत टीव्ही पाहणं ही त्यापैकीच काही कारणं.
अपूर्ण झोप, तणाव चेहऱ्यावर सूज येण्यामागचे खरे सूत्रधार आहेत. अशा परिस्थितीत अधिक गोड पदार्थ खाणं टाळावं. तसंच मीठाचं प्रमाण कमी करावं.
दिवसाची सुरुवातच नकारात्मक वळणावर झाल्यानंतर अनेकांचा कल आहारात बदल करण्याकडे दिसून येतो. अर्थात चांगल्या डाएटची निवड अनेकजण करतात.
चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी आहारात अधिक प्रमाणात तंतूमय घटतांचा समावेश करा. सकाळच्या वेळी पपई खा.
सकाळी आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर सूज दिसली तर, मॉइश्चरायजर किंवा खोबरेल तेलानं हलक्या हातानं चेहऱ्याला मसाज करा, असं केल्यास सूज उतरेल.
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळंही चेहऱ्यावर सूज येते. मासिक पाळीदरम्यान हे बदल अधिक प्रमाणात होत असल्यामुळं त्यादरम्यान चेहरा काहीसा सुजलेला दिसतो.
(वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)