घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते.
किटकनाशकांचा वापर न करताही घरगुती उपायांनी घरातील मुंग्या पळून लावा. या टिप्स नक्की वापरुन पाहा
मीठाचा वापर करुन तुम्ही मुंग्यांपासून सुटका करु शकता. फरशी पुसताना पाण्यात मीठ घाला. असे केल्याने घरात मुंग्या येणार नाही.
तिप्पट पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. या पाण्याचा स्प्रे मुंग्यांवर मारा यामुळं मुंग्या लगेचच पळून जातील आणि पुन्हा दिसणार नाहीत.
काळी मिरीची पूड करुन ती पाण्यात मिसळा आणि आता हे पाणी मुंग्यावर मारा. घरात एकही मुंगी फिरताना दिसणार नाही.
व्हिनेगर मुंग्यांवर फवारल्यास त्याचा लगेचच परिणाम जाणवतो. व्हिनेगरमुळं मुंग्या जागेवरच मरतात.
घरातून मुंग्या पळवून लावण्यास तुम्ही कॉफीचा वापरही करु शकता. मुंग्यांवर कॉफीचे पाणी टाकल्यास मुंग्या पुन्ही येणार नाहीत.