आजच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसपासून ते अगदी घरातही अनेकजण उभं राहून पाणी पितात.
पण वेळीच उभं राहून पाणी पिण्याची सवय मोडणे गरजेचे आहे. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक त्रासांचा सामना करावा लागतो.
उभं राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला पचनासंबंधीत समस्या उद्भवतात. यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीची तक्रार होऊ शकते.
उभे राहून पाणी प्यायल्याने युरिक ॲसिडचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही उभे राहून पाणी पिऊ नये.
उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे निवांत एक जागी बसून पाणी प्यावे.
उभे राहून पाणी प्यायल्यास पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. यामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते.
उभ्यानेच आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.
उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण बसून पाणी प्यायल्यास शरीरातील समतोल राखण्यास मदत होते.