जर तुम्हीही पहिल्यांदाच एखाद्याच्या प्रेमात पडला असाल तर तुम्ही त्या 30 लाख लोकांमध्ये एक आहात. मानसशास्त्रानुसार जगभरात दररोज सुमारे तीस लाख लोक स्त्री असो किंवा पुरुष पहिल्यांदाच प्रेमात पडतात.
असं म्हटलं जातं की, प्रेम व्हायचं असेल तर एका क्षणात होतं. नाही तर अख्ख आयुष्य कमी पडतं. एका सिद्धांतानुसार पुरुष फक्त 8 ते 10 सेकंदात प्रेमात पडतात. तर मुलींना सरासरी 15 दिवसांनी एखाद्यावर प्रेम होतं.
मानसशास्त्रानुसार कमी हसणाऱ्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात. तर पुरुषांना हसणाऱ्या महिला अधिक आकर्षक करतात.
ज्या मुली खूप बोलतात आणि मुलगा कमी बोलतो त्यांच्यामध्ये खूप खोल प्रेम असतं, असं मानसशास्त्रात सांगण्यात आलंय.
तरुणींना परफेक्ट पुरुष अजिबात आवडत नाहीत. एका संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, तरुणी चांगल्या स्वभाव असलेल्या मुलांशी फक्त मैत्री करतात. तर त्या प्रेम 'ग्रे शेड' प्रतिमा असलेल्या व्यक्तीच्या पडतात.
मानसशास्त्रानुसार, प्रेमाशी संबंधित कोणतीही वस्तू किंवा दृश्य पाहिलं, एवढंच नाही तर त्याबद्दल बोलले किंवा ऐकले तर तुमच्या मनात तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची प्रतिमा तयार होते.
एकमेकांना पाहिल्यावर हृदयाचे ठोके वाढतात हा एक फिल्मी डॉयलॉग नाही. तर मानसशास्त्रानुसार कपलने एकमेकांच्या डोळ्यात काही काळ टक लावून पाहिल्यास दोघांच्या हृदयाचे ठोके एकत्र होतात आणि वाढतात.
प्रेमाचं एक गुपित तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला काही सुंदर, प्रेमळ आणि भावनिक बोलायचं असेल तर त्याच्या डाव्या कानात बोला. त्याचा परिणाम अधिक होतो.
मानसशास्त्रानुसार आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारल्यामुळे तुमचा तणाव दूर होतो. तर कपलने मिठी मारल्यावर शरीरात ऑक्सिटोसिन ची निर्मिती होते.
आता कपलमधील नातं मजबूत करण्यासाठी आम्ही एक टीप देणार आहोत. जर तुम्हाला बॉयफ्रेंडसोबत नातं मजबूत करायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर बोला. तर तुम्हाला गर्लफ्रेंडसोबत नातं मजबूत करायचं असेल तर पार्टनरसोबत गेम खेळा, एकत्र बसा किंवा एकत्र एखादं काम करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)