Good Habits for Children: मुलं 10 वर्षांची होण्याआधीच त्यांना लावा 'या' सवयी; सगळेच म्हणतील, काय समजुतदार मुलं आहेत...
लहानपणापासूनच मुलांना स्वत:ची कामं स्वत: करण्याची सवय लावा. यामध्ये शाळेचं दप्तर भरणं, स्वत:च्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं, स्वत:चं ताट उचलणं या सवयींचा समावेश आहे.
मुलांनी कायमच इतरांचा आदर करावा ही सवयही त्यांना लावा. मोठ्यांशी बोलण्याची सवयसुद्धा मुलांना लावा.
वयाची 10 वर्ष पूर्ण होण्याआधी मुलांना टप्प्याटप्प्यानं त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्या. त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यास सुरुवात करा.
कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पहिली प्रतिक्रिया काय असावी आणि ती अडचण कशी सोडवावी याचं कसब मुलांना शिकवा.
पैशाची उधळपट्टी टाळणं, बचत करणं, अवाजवी खर्च न करणं आणि तोंडातून पडलेला शब्द पुरवलाच पाहिले ही सवय न लावणं याकडे भर द्या. मुलांना पैशांचं महत्त्वं पटवून द्या.
मुलांना व्यायामाचं महत्त्वं कमी वयात पटवून द्या. म्हणजे भावी आयुष्यात ते चांगल्या जीवनशैलीच्या वाटेवर चालू लागतील.