हल्ली टाईप 2 मधुमेहाचा धोका दर चौथ्या व्यक्तीला असल्याचं पाहायला मिळतं. असंतुलित जीवनशैली यासाठी जबाबदार ठरते.
नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार आठवड्यातून दोन वेळा रेड मीट, अर्थात मटण किंवा तत्सम मांस खाल्ल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो.
हार्वर्डच्या निरीक्षणानुसार रेड मीट खाणाऱ्यांमध्ये ते कमी खाणाच्यांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका 62 टक्के अधिक असतो.
सॉसेज, बेकन हॅम आणि हॉट डॉग अशा प्रोसेस्ड रेड मीटच्या सेवनामुळं मधुमेहाचा अधिक धोका असतो. ज्यामुळं रेड मीट, मटणाचं सेवन कमी करावं.
रेड मीटऐवजी नट्स, बीन्सचं सेवन केल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका 30 टक्के कमी होतो. यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय यामध्ये असणारे तंतुमय घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
मधुमेहाचा धोका आहे म्हणून मटण खायचच नाही याचा असा अर्थ होत नाही. आठवड्यातून एकदा मटण प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळं तोटा होत नाही.