दारुमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून पिणं किती धोकादायक?
Jun 15,2024
मद्य करताना आपण अनेक पाण्याव्यतिरिक्त सोडा, कोक, ज्यूस यासह अनेक गोष्टी मिसळून पित असतात.
अनेकजण तर दारु एनर्जी ड्रिंकमध्ये मिसळून पितात. पण हे असं करणं आरोग्याला धोके निर्माण करु शकतं.
दारु आणि एनर्जी ड्रिंक हे एकमेकांपेक्षा फार वेगळे आहेत. एक तुम्हाला एनर्जी देतं, तर दुसऱ्याने सुस्त वाटू शकतं.
एनर्जी ड्रिंक मद्याचा प्रभाव कमी करु शकतं आणि तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागं ठेवू शकतं. अशा तुमचा गैरसमज होऊ शकतो आणि जास्त मद्यप्राशन करण्याची शक्यता असते.
एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिनचं प्रमाण अधिक असतं. ते तुमची एनर्जी आणि उत्तेजना वाढवतं. अशात तुम्हाला कॉफीप्रमाणे मद्यही जास्त प्यावंसं वाटू शकतं.
जास्त मद्य प्यायल्याने भ्रम, उलटी, झटके आणि श्वास घेताना त्रास अशा गोष्टी जाणवू शकतात.
तुम्ही मद्यासह एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्यास ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते.
एनर्जी ड्रिंकमध्ये फार प्रमाणात साखर असते. अशात तुम्ही दारुसह त्याचं सेवन केल्यास वजनात वेगाने वाढ होऊ शकते.