जे सॉफ्टी आईस्क्रीम अतिशय आवडीनं खाल्लं जातं ते एक डेअरी प्रोडक्ट, अर्थात दुग्धजन्य उत्पादन नाही हे माहितीये का?
सॉफ्टी आईस्क्रीममध्ये 61.2 टक्के साखर, 34 टक्के स्थायूरुपात दूध आणि 4.8 टक्के फ्लेवरिंग एजंट असे पदार्थ मिसळले जातात. RAAR नं एका निरीक्षणानंतर याबबातचा खुलासा केला.
सॉफ्टी आईस्क्रीममध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं हे वजन वाढण्यामागचं मुख्य कारण ठरतं. साखरेच्या अतीसेवनामुळं शरीरात चर्बीचं प्रमाण वाढतं.
सॉफ्टी आईस्क्रीमच्या अतीसेवनामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक वाढतं ज्यामुळं मधुमेहाचा धोका बळावतो.
आईस्क्रीमच्या सेवनामुळं दात किडण्यासह दातांच्या इतरही समस्या डोकं वर काढतात.
साखरेच्या अतीसेवनामुळं हृदयविकाराचा धोकाही बळावतो. शरीरात अती साखरेच्या सेवनामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं हृदयरोगाची समस्या बळावते.
सॉफ्टीमध्ये आणि तत्सम आईस्क्रीममध्ये मिसळण्यात आलेले फ्लेवरिंग एजंट असल्यामुळं त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळं अनेकदा अॅलर्जी आणि पोटाचे विकारही सतावतात.