'या' ठिकाणांवर सेल्फी काढल्याने होऊ शकतो कारावास

Oct 25,2024


स्वतःचे फोटो काढण्यासाठी सेल्फी हा एक उत्तम पर्याय आहे.


आजकाल सेल्फी काढण्याची क्रेझ सर्वांमध्येच दिसून येते.


अशीही काही ठिकाणे आहेत जेथे सेल्फी काढल्याने चक्क कारावास होऊ शकतो.

रेल्वे ट्रॅक

रेल्वे कायद्याच्या कलम 147 अंतर्गत, रेल्वे पोलीस तुम्हाला ट्रॅकवर सेल्फी घेतल्याबद्दल अटक करू शकतात.

मरीन ड्राईव्ह

मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि वांद्रे बँडस्टँड हे नो सेल्फी झोन आहेत. इथे सेल्फी काढणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

मतदान केंद्र

मतदान केंद्रात फोटो काढण्यास सक्त मनाई असते. मतदान यंत्रावरील बटण दाबताना चुकूनही फोटो काढू नका.

गोवा बीच

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यात भरती-ओहोटीमुळे प्रशासनाने सेल्फी घेण्यास बंदी घातलेली असते.

कुंभमेळा

कुंभमेळ्याच्या काळात गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सेल्फी काढणे धोकादायक ठरते. असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील होऊ शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story