जास्त करून महिला सर्वच भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात. जे एकदम चुकीचे आहे.
ज्यामध्ये सर्वात प्रथम कांदा हा फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये. कारण तो लगेच खराब होतो.
कांद्याप्रमाणे लसूण देखील ओलावा शोषून घेतो. त्यामुळे तो कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका.
बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यामधील कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट बदलू शकतात. तो नंतर गोड लागू शकतो.
संशोधनानुसार, काकडी सलग तीन दिवस 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्याने ती लवकर सुकते.
तर टोमॅटो देखील फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव खराब होण्याची शक्यता असते. ते बाहेर हवेत ठेवल्यास ते अधिक काळ टिकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)